Sunday, September 28, 2014

सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला !
रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला ?

गंधित नाजुक पानांमधुनी, सूर छेडिते अलगद कुणी
अर्थ कधी कळणार तुला, धुंदणाऱ्या सुरातला ?

निळसर चंचल पाण्यावरती, लयीत एका तरंग उठती
छंद कधी कळणार तुला, नाचणाऱ्या जलातला

जुळता डोळे एक वेळी, धीट पापणी झुकली खाली
खेळ कधी कळणार तुला, दोन वेड्या जीवातला

No comments:

Post a Comment