Friday, August 9, 2013

राग तुझा लय भारी
नाकावरच असतो
कधी बनून साप विशारी
समोरच्याला डसतो
.
.
.
.
प्रेम हि करतेस तू
मायाही लावतेस
कधी दुसऱ्यावरच राग
माझ्यावरच काढतेस
.
.
.
.
कोणी कोणाचे खात नाही
कोणी कोणाचे मागत नाही
मग का प्रेमात मरतात
जर कोणी कोणाचे असत नाही
.
.
.
.
मातीतून आकार घेतला
मातीचाच माणूस झाला
मातीमोल ह्या जीवनाचा
किती अहंकार जोपासला
.
.
.
.
हो म्हटले मी
नाही म्हटले तू
हो नाही म्हणता म्हणता
वेळ गेली निघून

No comments:

Post a Comment