Monday, December 4, 2017

Risk - कारण मी कधीच रिस्क घेत नाही

 
दारू पिताना मी कदीच रिस्क घेत नाही मी संध्याकाळी घरी येतो , तेव्हा बैको स्वैंपाक करत असते
शेल्फ मधील भांड्यांचा आवाज येत असतो ,
मी चोर पावलाने घरात येतो, माझ्या काळ्या कपाटातून बाटली काढतो
शिवाजी महाराज फोटोतून बघत असतात ,
तरी या कानाचे त्या कानाला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही ,,,,

वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरून मी ग्लास काढतो
चटकन एक पेग भरून आस्वाद घेतो
ग्लास धुऊन पुन्हा फळीवर ठेवतो
अर्थात बाटली हे काळ्या कापतात ठेवतो
शिवाजी महाराज मंद हसत असतात
स्वैंपाक घरात डोकावून बघतो
बैको कणिक मालत असते ,
या कानाचे त्या कानाला पत्ता लागत नाही
कारण मी कधीच रिस्क घेत नाही ,,,,

मी :- जाधवांच्या मुलीचे लग्न जमले का ग ?
ती :- चेय ! दानात असेल तर मिळेल न चांगले शटल

मी परत बाहेर येतो , काळ्या कपाटाच्या दराचा आवाज येतो
बाटली मात्र मी हळूच काढतो
वापरात नसलेल्या फळीच्या मोरीवरून ग्लास काढतो
पटकन पेगचा आस्वाद घेतो
बाटली धूअन मोरीत ठेवतो
कला ग्लासपण कापतात ठेवतो
तरी या कानाचे त्या कानाला पत्ता लागत नाही
कारण मी कधीच रिस्क घेत नाही ,,,,

मी :- अर्थात जाधवांच्या मुलीचा अजून काही लग्नाचे वैय झालेले नाही ?
ती :- नाही की आठावीस वर्षाची घोडी झाली आहे म्हणे ....
मी :- ( आठवून जीभ  चावतो ) अच्छा अच्छा

मी पुन्हा काळ्या कपाटातून कणिक काढतो
मात्र कपाटाची जागा आपोआप बदलीली असते
फळीवरून बाटली काढून पटकन मोरीत एक पेग मारतो
शिवाजी महाराज मोठ्याने हसतात
फळी कणकेवर ठेवून शिवाजींचा फोटो धूअन मी काळ्या कापतात ठेवतो
बैको गस वर मोरीच ठेवत असते
या बाटलीचे त्या बाटलीला पत्ता लागत नाही
कारण मी कधीच रिस्क घेत नाही ,,,,

मी :- ( चीधुउन ) जाधवांना घोडा म्हणतेस ? पुन्हा बोललीस तर जीभच कापून टाकीन तुझी ....!
ती :- उगाच कटकट करू नका बाहेर जौउन पडा

मी कणके मधून बाटली काढतो
काळ्या कापतात जाऊन एक पेग मळतो
मोरी धूअन फळीवर ठेवतो
बैको माझ्या कडे बघून हसत असते
शिवाजी महाराजांचा स्वैंपाक चालूच असते
पण या जाधवांचे त्या जाधवांना पत्ता लागत नाही
कारण मी कधीच रिस्क घेत नाही ,,,,

मी :- ( हसत हसत ) जाधवांनी घोडीशी लग्न ठरले म्हणे  !!!
ती :- ( ओरडून ) तोंडावर पाणी मारा !!!

मी परत स्वैंपाक घरात जातो , हळूच फळीवर जाऊन बसतो
गस हि फळीवरच असतो ,
बाहेरच्या खोलीतून बाटल्यांचा आवाज येत असतो ....
मी डोकावून बघतो .... बैको मोरीत दारूचा आस्वाद घेत असते
या घोडीचे त्या घोडीला पत्ता लागत नाही
अर्थात शिवाजी महाराज कधीच रिस्क घेत नाही ,,,,
जाधवांचा स्वैंपाक होई पर्यंत .........
मी फोटोतून बैको काढे बघत असतो !!!
कारण मी कधीच रिस्क घेत नाही ,,,,